पिलीव – माळशिरस तालुक्यातील पिलीव, निमगाव, अकलूज रस्त्याची अवघ्या दोन वर्षांतच प्रचंड दुरावस्था झाली आहे.गेल्या अवघ्या दोन वर्षांपूर्वीच हा संपूर्ण रस्ता करण्यात आला होता.त्यावेळेस पिलीव परिसरातील नागरिकांनी अकलूज येथील सार्वजनिक बांधकाम विभागाकडे रस्त्याचे काम चांगले व दर्जेदार व्हावे म्हणून वारंवार तक्रारी केल्या होत्या त्यावेळेस बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनीच संबंधित ठेकेदाराला वरदहस्त म्हणून भुमिका बजावल्यामुळे सध्या रस्त्याची झिंजेवस्ती हद्दीत एवढी चाळण झाली आहे की सध्या ह्या रस्त्याचे काम अगदी दहा _ पंधरा वर्षांपुर्वी झाले आहे की काय अशी अवस्था सध्या रस्त्याची झाली आहे.सध्या साखर कारखाने सुरू झाले आहेत या रस्त्यावरुन मोठ्या प्रमाणात ऊसाची वाहतुक होत आहे .
यामुळे तर रस्त्याची जास्तच दुरावस्था होत आहे .या रस्त्याने अकलूज, माळशिरस, पिलीव, निमगाव यासह इतर गावांना जाणाऱ्या प्रवाश्यांची तसेच विद्यार्थी यांची कायमच रहदारी व वर्दळ असते .पण सध्या या रस्त्यावरुन प्रवाश्यांना आपला जिव मुठीत धरुन प्रवास करावा लागत आहे.सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे लक्ष देणार की नाही असा प्रश्न नागरिकाधुन विचारला जात आहे .
फोटो _ झिंजेवस्ती हद्दीत रस्त्याची झालेली दुरावस्था


























