माढा – रयत शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालय, माढा येथील विद्यार्थीनी कु. सायली शेळके हिची राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. महाविद्यालयातील प्रतिभावान खेळाडूंमध्ये तिची गणना होत असून, विभागीय स्पर्धेत अरुण कुमार वैद्य स्टेडियम, पुणे येथील कामगिरीच्या बळावर तिने राज्य पातळीवर प्रवेश मिळवला आहे.
सायलीच्या यशाबद्दल महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष मा. संजीव पाटील, अॅड. मिनल साठे, प्राचार्य डॉ. सुनील हेळकर , प्रा. अशोक लोंढे, डॉ. घनश्याम हराळे, शारीरिक शिक्षण संचालक डॉ. पंकज ढमाळ तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करत तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

























