माढा : माढा तालुक्यातील तडवळे ते वडाचीवाडी १०० वर्षांपासूनचा शिव रस्ता जबरदस्तीने बंद करून शाळा कॉलेज विद्यार्थ्यां, अबालवृद्ध यांना वैद्यकीय सेवा मिळण्यास अडथळा निर्माण करणा-या व ६० लाख रुपयांची खंडणी मागणारे व्यक्तीवर गुन्हा दाखल करून अडवलेला रस्ता खुला करून देण्याच्या मागणीसाठी बहुजन संघर्ष समितीचे नागनाथ वाघमारे यांचे नेतृत्वाखाली तडवळे ग्रामस्थांनी २ डिसेंबर मंगळवार पासून माढा पोलिस ठाण्यासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
तडवळे(म) -वडाचीवाडी( त,म) रेल्वे पुल लगत शिव रस्ता सुमारे १००वर्षापासुन वहिवाट असुन ज्या व्यक्तीने हा रस्ता बंद केला आहे. माढा तहसीलदार, मंडल अधिकारी, पोलिस प्रशासन,रस्ता खुला करण्यासाठी सहकार्य करत नाहीत. रस्ता बंद करणाऱ्या संबंधित व्यक्तीला ते पाठीशी घालत आहेत अस ही निवेदनकर्त्याचं म्हणणं आहे. तसेच तात्काळ त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करून नागरिक व विद्यार्थ्यांसाठी तो रस्ता खुला करावा या मागणीसाठी विश्वनाथ हनुमंत परबत,शैलेश दिगाबर ढेरे,रमेश दिगाबर ढेरे,सुरेश दिगाबर ढेरे,पांडुरंग बळीराम परबत, रतन सुरेश ढेरे,अजना सुभाष ढेरे,रसीका रमेश ढेरे उपोषणाला बसले आहेत.


























