जिंतूर / परभणी – आमदार कॉलनी येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात दत्तजयंती उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. श्रीदत्त जन्मोत्सवानिमित्त सात दिवसीय पारायण, होम-हवन, मल्हारीयान जप, आरती तसेच पालखी सोहळा असे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

सकाळी सात वाजल्यापासून भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. साडेआठ ते साडे दहादरम्यान पारायण पठण पार पडले. दुपारी होम व मल्हारीयानाचे अध्याय, तर संध्याकाळी महाआरतीने वातावरण दत्तमय झाले.

दर्शनासाठी महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. स्थानिक व्यापारी, सेवेकरी व महिलासेवेकरी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

























