हिंगोली – सीसीटीएनएस कार्यप्रणाली ही महाराष्ट्रात सप्टेंबर 2015 पासून चालु झालेली असुन त्यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील सर्व पोलिस स्टेशन चे ऑफलाईन / ऑनलाईन कामकाज चालते. त्यामध्ये तक्रारदार यांची तक्रार घेवुन ती ऑनलाईन मध्ये गुन्हे दाखल करुन सर्व गुन्ह्याचा तपास हा वेळे मध्ये सीसीटीएनएस प्रणाली मध्ये भरण्यात येत असतो. तसेच या प्रणाली द्वारे आरोपींचा पुर्व इतिहास पडताळुन त्यांचेवर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिबंधक कार्यवाही करण्यात येतात.
हिंगोली जिल्हयामध्ये सीसीटीएनएस नोडल अधिकारी म्हणुन श्री. कमलेश मीना, अपर पोलीस अधिक्षक हिंगोली हे कामकाज पाहतात. श्री. कमलेश मीना, अपर पोलीस अधीक्षक हिंगोली यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन ला सीसीटीएनएस कामकाज करण्यासाठी एक किंवा दोन अंमलदार यांची सीसीटीएनएस पर्यवेक्षक म्हणुन नेमणुक करण्यात आली असुन सदर पर्यवेक्षक अंमलदार यांचे कामकाजाकडे लक्ष देण्यासाठी सीसीटीएनएस देखरेख अधिकारी म्हणुन नेमणुक केलेली आहे.
सदर सीसीटीएनएस देखरेख अधिकारी वर सीसीटीएनएस पर्यवेक्षक यांना प्रत्येक महिन्याला सीसीटीएनएस शाखा, हिंगोली येथे कार्यरत असलेले पोलीस हवालदार श्री. राजु पांडुरंग हमाने, पोलीस अंमलदार श्री. राहुल परमेश्वर तडकसे व महिला पोलीस अंमलदार पुजा सखाराम जाधव यांचे मार्फत सीसीटीएनएस कार्यप्रणाली तसेच सदर प्रणालीशी निगडित असलेले सर्व प्रकारचे पोर्टल जसे सीसीटीएनएस, आयसीजेएस, आयटीएसएसओ, क्रायमॅक, ईसाक्ष व इतर प्रकारचे पोर्टलवर सविस्तर मार्गदर्शन करुन प्रशिक्षण दिल्या जाते तसेच प्रणालीशी निगडित असलेल्या सर्व प्रकारच्या अडीअडचणी तात्काळ सोडवल्या जातात व सर्व पर्यवेक्षक यांना वेळोवेळी कामकाज करून घेण्याकरिता पाठपुरावा करण्यात येतो. त्यामुळे जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशनचे कामकाज सुरळीत चालते.
श्री. श्रीकृष्ण कोकाटे पोलीस अधीक्षक, हिंगोली व श्री. कमलेश मीना, अपर पोलीस अधीक्षक हिंगोली यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि. मोहन भोसले स्थागुशा हिंगोली, सपोनी श्री. शिवसांब घेवारे स्थागुशा हिंगोली, सीसीटीएनएस शाखा, पोलीस अधीक्षक कार्यालय हिंगोली येथे कार्यरत असलेले पोलीस हवालदार श्री. राजु पांडुरंग हमाने, पोलीस अंमलदार श्री. राहुल परमेश्वर तडकसे व महिला पोलीस अंमलदार पुजा सखाराम जाधव यांनी जिल्ह्यातील सर्व सीसीटीएनएस पर्यवेक्षक/अंमलदार केशव पुंड, राम धुमाळे, पुजा पवार, गजानन शिंदे, भारत डाखुरे, नामदेव जाधव, मंगेश नरवाडे, गुरुपवार, अमोल अडकीने, केतन तायडे, विश्वनाथ दळवे, रमेश बोरकर, लक्ष्मन हागवने, मारोती परडे, शितल आगाशे सर्व पोस्टे प्रभारी अधीकारी, सर्व तपासीक अधिकारी/अंमलदार व सीसीटीएनएस पर्यवेक्षक व डयुटी अंमलदार या सर्वानी वेळेत सीसीटीएनएस कामकाज केल्याने गुन्हे अन्वेशण विभाग महाराष्ट्र राज्य पुणे येथुन प्रत्येक महिन्यात सीसीटीएनएस कामकाज त्यामध्ये डाटा फिडिंग, विविध पोर्टल, ऑनलाईन कामकाज, चांगल्या कामगिरीच्या अहवालावरुन माहे ऑगस्ट 2025 मध्ये 201 पैकी 201 गुण 100% टक्के कामगिरी केल्याने हिंगोली जिल्हा महाराष्ट्रामध्ये 53 युनीट मधुन पहिला आला आहे. सीसीटीएनएस कार्यप्रणाली मध्ये हिंगोली जिल्ह्याची कामगिरी ही उल्लेखनिय झाल्याने अभिनंदन केले आहे,
पोलीस अधीक्षक कोकाटे यांनी सर्व सीसीटीटीएनएस चे कामकाज करणारे अधिकारी व अंमलदार यांचे अभिनंदन केले.


























