सोलापूर – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर २०२५ रोजी मुंबईत अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेकडून अनारक्षित विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. यामध्ये कलबुरगि – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई अनारक्षित विशेष गाड्या धावेल:
कलबुरगि येथून ०५ डिसेंबर रोजी सायं. ०६:३० वाजता सुटेल आणि पुढील दिवशी सकाळी ०८:२० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल. सोलापुरला आगमन रात्री ०९.४० होईल तर प्रस्थान सकाळी १०.२० वाजता होईल.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून ०७ डिसेंबर रोजी मध्यरात्री १२:२५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सकाळी ११:३० वाजता कलबुरगि येथे पोहोचेल. सोलापुरला आगमन सकाळी ०८:४५ होईल तर प्रस्थान सकाळी ०९:०० वाजता होईल.
गाणगापूर रोड, अक्कलकोट रोड, सोलापूर, कुर्डूवाडी, दौंड, पुणे, लोणावळा, कल्याण आणि दादरअसे या गाड्यांचे थांबे असतील. २२ स्लीपर/सामान्य द्वितीय/सेकंड सीटिंग (अनारक्षित) व २ लगेज-कम-ब्रेक व्हॅन्स एकूण २४ कोच अशी रचना या गाड्यांची असतील.
प्रवाशांनी वैध तिकिटांसह प्रवास करावा आणि महापरिनिर्वाण दिनानिमित्त चालविण्यात आलेल्या विशेष गाड्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सोलापूर विभागाचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक योगेश पाटील यांनी केले आहे.
























