सांगोला – फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च, सांगोला येथे प्रथम वर्ष इंजिनिअरिंग विभागात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक्सप्रेस अँड ईमप्रेस-कॅम्पस टू कार्पोरेट कम्युनिकेशन या विषयावर प्रा.सत्यशिल कोळेकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
यावेळी उपप्राचार्या डाॅ.विद्याराणी क्षीरसागर, विभाग प्रमुख डाॅ.ज्योती शिंदे उपस्थित होत्या. आयुष्यातील प्रत्येक क्षेञामध्ये आत्मविश्वास गरजेचा असतो. माणसाला आयुष्यात मोठे यश मिळवायचे असेल तर त्याच्यामध्ये आत्मविश्वास असला पाहिजे. तुमची खरी ओळख आणि तुमच्या डोक्यात स्वतःबद्दल असणारा प्रामाणिक पणा महत्वाचा असतो. स्वतःची ताकद अन् गुण ओळखा आणि लहान लहान उद्दिष्टे साध्य करण्यावर लक्ष केंद्रित करा. सतत सराव आणि आत्मपरीक्षण यांसारख्या सवयी विकसित करून हळूहळू तुम्ही तुमचा आत्मविश्वास वाढवू शकता.
जर तुमच्याकडे आत्मविश्वास नसेल तर आयुष्यात तुम्ही काहीच करू शकणार नाही म्हणून आत्मविश्वासाने आयुष्यातील प्रत्येक गोष्टीवर, स्वतःच्या क्षमतेवर आणि कौशल्यांवर विश्वास ठेवला पाहिजे असे मत प्रा.सत्यशिल कोळेकर यांनी बोलताना व्यक्त केले.
यादरम्यान विविध ॲकटिव्हिटी घेण्यात आल्या. सुञसंचलन प्रा.अर्चना गुरव यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

























