सोलापूर – गांधी नाथा रंगजी दिगंबर जैन जनमंगल प्रतिष्ठान संचलित गांधी नाथा रंगजी विद्यालय मराठी माध्यम प्राथमिक व माध्यमिक विभागाचे सन 2025 -26 वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ दिनांक 4/12/2025 गुरुवार रोजी मोठ्या उत्साहात पार पडला.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे डॉक्टर नीलकंठ पोतदार एमडी .पॅथॉलॉजिस्ट व डॉक्टर नागेंद्र व्हनसुरे नेत्ररोग तज्ज्ञ तसेच संस्थेचे अध्यक्ष संजय भई गांधी हे कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण होते.
कार्यक्रमाची सुरुवात रेखा बोंदर्डे मॅडम व 8 वी 9 वी च्या विद्यार्थिनींनी णमोकार मंत्र, ईशस्तवन व स्वागत गीताने केली .प्रमुख पाहुणे ,अध्यक्ष ,संस्था अध्यक्ष व मुख्याध्यापिकांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन व भगवान महावीर , सरस्वती यांचे प्रतिमा पूजन करण्यात आले.
मुख्याध्यापिका सरोजना मुलिंटी मॅडम यांनी प्राथमिक विभागाचे अहवाल वाचन तर मुख्याध्यापिका पुरवत स्मिता यांनी माध्यमिक विभागाचे अहवाल वाचन केले.
विविध स्पर्धांमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. या याप्रसंगी श्री अभिषेक गांधी सर ,श्री अमित उपाध्ये ,श्री बिडकर सर हे देखील उपस्थित होते. बक्षिसाचे यादी वाचन सौ. संगीता नरे मॅडम, सौ वर्षा शिंदे मॅडम व सौ भाग्यश्री बेळ्ळे मॅडम यांनी केले.
प्रमुख पाहुणे डॉ. नीलकंठ पोतदार यांनी आपल्या भाषणात आजकालच्या कठोर स्पर्धेला सामोरे जाऊन यश मिळवल्याबद्दल विद्यार्थ्यांचे तसेच त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी अभ्यास, खेळ, व कला यांचा समन्वय साधला पाहिजे असे सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.नागेंद्र व्हनसुरे यांनी विद्यालयात आदर्श विद्यार्थी म्हणून सावित्रीबाई फुले यांचे स्वप्न साकार करणाऱ्या दोन विद्यार्थिनी कु. तनुश्री बद्दुरकर व कु. समृद्धी पतंगेची निवड झाल्याबद्दल विशेष कौतुक केले. मोबाईलचा अतिरेक टाळावा असेही मार्गदर्शनपर भाषणात सांगितले.
विद्यार्थ्यांनी विविध गाणी अतिशय सुंदर रित्या सादर केली. गाण्यांचे सूत्रसंचालन शिक्षिका सौ. शिल्पा हेडगिरे व सौ. भाग्यश्री बेळ्ळे यांनी केले.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.मृणाली जैन मॅडम यांनी तर आभार प्रदर्शन सौ. रुपाली लामकाने मॅडम यांनी केले.



























