सोलापूर – शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व शहरप्रमुख सचिन चव्हाण यांच्या उपस्थितीत अशोक चौक भागातील सामाजिक कार्यकर्ते दत्ता पवार, आनंद विटकर, व लक्ष्मण पवार यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसोबत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विचारांना प्रेरित होऊन शिवसेना पक्षात आम्ही प्रवेश केला. येणाऱ्या काळात शिवसेना पक्ष वाढविसाठी, गोर गरीब नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न व पक्षाची ताकद वाढविण्याचा प्रयत्न आम्ही करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख तुकाराम मस्के, युवानेते श्रीनिवासजी संगा, कामगार सेना जिल्हाप्रमुख सायबन्ना तेगेळी, सचिन जवळकर यांच्यासह पदाधिकारी व असंख्य शिवसैनिक उपस्थित होते.


























