सोलापूर – होटगी येथे झालेल्या द सोलापूर तालुका स्तर क्रीडा स्पर्धेत जि प प्रा शाळा यत्नाळ शाळेने विविध क्रीडा स्पर्धेत विजेते पद मिळवले. लहान गट मुली लंगडी व मोठा गट लंगडी मुलींनी प्रथम क्रमांक प्राप्त करून जिल्हा स्तर स्पर्धेसाठी निवड झाली.
तसेच लहान गट लंगडी मुले यांनी उविजेते पद पटकावले. यशस्वी संघास गटशिक्षणाधिकारी जयश्री सुतार, शिक्षण वि अधिकारी गुरुबाळा सनके व सैफन आळगी, केंद्रप्रमुख विजय गेंगाने यांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देण्यात आले.
यशस्वी संघास राष्ट्रीय पंच व प्रशिक्षक यंकप्पा शेंडगे व नागनाथ येवले यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. तसेच प्रमोद कस्तुरे, केदारनाथ चौगुले, इम्रान शेख, चंद्रकांत सुरवसे, अपर्णा तुळजापूरकर, अन्सारी व भाग्यश्री गायकवाड मॅडम, भालेराव सर यांनी विशेष परिश्रम घेतले.
या यशाबद्दल शाळा व्य अध्यक्ष निंगराज तोरनगी, उपाध्यक्ष शीतलताई पाटील, सरपंच सुनंदाताई वाघमोडे, उपसरपंच सुनील हिरापुरे इत्यादीनी अभिनंदन केले. शाळेच्या या यशाचे सर्वत्र कौतक केले जात आहे.

























