सोलापूर – सौ. संध्या सूर्यकांत धर्माधिकारी सोलापूर यांच्या ‘बेरं’ या कथासंग्रहाला पुरस्कार प्राप्त झाला आहे. साहित्यप्रेमी सेवाभावी फाउंडेशन फलटण यांचे राज्यस्तरीय ‘ माणगंगा साहित्यप्रेमी गौरव पुरस्कार २०२५’ प्रदान करण्यात आले. ही संस्था गेली बारा वर्षे साहित्यिकांना पुरस्कार देऊन प्रोत्साहित करत आहे.
स्वराज्य करिअर ॲकॅडमी, दहिवडी येथे संपन्न झालेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्यास मा. ताराचंद्र आवळे, अध्यक्ष साहित्यप्रेमी सेवाभावी फाउंडेशन फलटण; मा. शिवलिंग मेनकुदळे,जेष्ठ साहित्यिक व सहसचिव रयत शिक्षण संस्था सातारा; मा. रविंद्र येवले, जेष्ठ साहित्यिक; मा. अनिल धडस, लाइफ वर्कर रयत शिक्षण संस्था सातारा यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. महाराष्ट्रातील सर्वदूर पसरलेल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील एकूण १९ साहित्यिकांना या सोहळ्यात पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सौ. संध्या धर्माधिकारी यांच्या ‘बेरं’ या ग्रामीण कथासंग्रहाला मिळालेला हा दुसरा मानाचा पुरस्कार आहे. त्यांच्या ‘रकमा’ या ग्रामीण कथासंग्रहाला एकूण दहकौतुक करण्यात येत आहे.

























