सोनखेड / नांदेड – सोनखेड हद्दीतील मौजे निळा येथे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक साईनाथ पुयड यांच्या पथकाणे धडक कार्यवाही करून 19किलो 480ग्रॅम गांजा जप्त करून आरोपी यास अटक केली मौजे निळा येथे एका इसमाने आपल्या शेतीच्या शिवारात गांजा चे लहान मोठे उग्रट वास असलेले हिरवे ओलसर झाडें त्यास बोन्डे व फुले असलेले झाडे विना परवाना बेकायदेशीररित्या एन डी पी एस तरतुदीचा भंग करून गांजा ची शेती लावगड करून विक्री साठी आर्थिक फायद्यासाठी वाळवीत असलेला आढळून आल्याने शिवाजी गणपती डांगे वय 40 रा निळा यास मुद्देमाल एकूण 19 किलो 480 ग्रॅम अंदाजे किंमत प्रति 10 हजार रुपये प्रमाणे एकूण किंमत 1 लाख 94800 रुपयाचा गांजा जप्त करून साईनाथ पुयड व्यवसाय पोलीस उपनिरीक्षक स्था गु शा यांच्या फिर्यादी वरून एन डि पी एस अमली पदार्थ या गुन्ह्यात कलम 20(B)11(B)22 अन्वये गुन्हा दाखल केला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वैशाली कांबळे हया करीत आहेत या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून या पाच ते सहा दिवसात सोनखेड पोलीस ठाण्यात क्राईम चा आलेख वरचेवर वाढत असून पाच दिवसात तीन अट्रॅसिटी एक हाफ मर्डर आणी आता नार्को ड्रॅग डिपार्टमेंट खाली गुन्हे यामुळे या पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्व काही अलबेल असल्याचे पाहाव्यास मिळत आहे अगोदरच रेती माफियाचा मुक्त हौदोस भरधाव वेगाने जाणाऱ्या रेती च्या हयावा यामुळे अगोदरच शेतकऱ्यांना रात्री अपरात्री जीव मुठीत धरून शेतात जावे लागत आहे.
पण पोलीस प्रशासन याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत असून पोलिसांच्या भूमिकेवर सर्वत्र शेतकरी आणी नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे सदरील पथक हे रेती माफियाकडे जाणून बुजून अर्थपूर्ण दुर्लक्ष करत असल्याचे नागरिकांकडून बोलल्या जात आहे
























