मुखेड / नांदेड – महाराष्ट्रांच्या विविध ग्रामीण भागातील खेड्यात आता यात्रा महोत्सवाला सुरुवात झाली असून ग्रामीण भागातील लोकांना यात्रा म्हणजे एक पर्वणीच असते.
खेळणे , मिठाई , कटलेरी, हाटेल, अंगाशी पाळणे , चक्कर गन्ना, मनोरंजन अशी कितीतरी दुकाणे थाटली जातात प्रत्येकाने आपल्या परिने यात्रेचा आनंद घेत असतो . यात्रा म्हटले की येथे जंगी कुस्त्यांचा सामना पहावयास मिळतोच .
असाच कुस्ती सामना मुखेड तालुक्यातील मौजे राजुरा बुद्रुक येथे दि. ४ डिसेंबर २०२५ रोजी पहावयास मिळाला आहे.
राजुरा बुद्रुक येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही श्री खंडोबा यात्रेनिमित्त जंगी कुस्त्यांचा सामना ठेवण्यात आला होता. यात्रेचे मानकरी गंगाधर पाटील इंगळे,याच्या वतीने दरवर्षी कुस्तीचे नियोजन केले जाते.
यावेळी सुध्दा यांच्या नियोजनाखाली जंगी कुस्त्यांचा सामना मोठ्या उत्साहात पार पडला.
यावेळी सरपंच शिवदास राऊत ,उपसरपंच हाणमंतराव पाटील झरे,साहेबराव मामीलवाड, बाबुराव जाधव,पोलीस पाटील शिवाजी इंगळे,प्रदिप पाटील इंगळे,सुधाकर पाटील, खंडू राजुरे सखाराम पाटील, दत्ता भंडारे,मारोती जंगमवाड, पत्रकार माधव जंगमवाड व गावातील ज्येष्ठ मान्यवर, नवतरुण मित्र मंडळी व नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते .


























