मुक्रमाबाद / नांदेड – जुन्या भांडणाचा वाद घालत राजुरा येथे जत्रेत आलेल्या अंबुलगा येथील तरुणांच्या पोटात खंजीर खुपसून खून करण्यात आल्याची घटना दि.3 डिसेंबर रोजी संध्याकाळी 7-30 वाजता घडली असून या जखमी तरुणाचा उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे उपचार दरम्यान मृत्यू झाला.याप्रकरणी दोघांविरुद्ध मुक्रमाबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुखेड तालुक्यातील अंबुलगा येथील मयत राहुल संतोष येरगे वय वर्ष 17 हा तरुण क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले महाविद्यालय राजुरा येथे इयत्ता बारावी शाखेत शिक्षण घेत होता याच शाखेतील प्रथमेश उर्फ आदीनाथ जंगमवार व मंगेश माधवराव इंगळे रा.राजुरा या दोन तरुणांचा गेल्या चार महिन्यापासून शुल्लक कारणावरून सतत वाद होत होता हा वाद भांडणाच्या विकोपाला गेला होता.सध्या राजुरा येथे खंडोबाची यात्रा सुरू असल्यामुळे अंबुलगा येथील राहुल संतोष येरगे हा आपल्या दोन मित्रासोबत देवदर्शन करण्यासाठी राजुरा येथील जत्रेला गेला होता.
योगायोग जत्रेतील मंदिरासमोर त्याच्याच शाखेतील दोन तरुणांची भेट झाली यात बाचाबाची सुरू झाली भांडणाचे रूपांतर फारच विकोपाला गेले यात जुन्या भांडणाचा वाद घालून राहुल येरगे या तरुणांला मंदिर शेजारी रोडवर नेऊन राजुरा येथील दोन तरुणांनी खंजीर काढून राहुल येरगे यांच्या पोटात खुपसून गंभीर जखमी केले व तेथून पसार झाले. त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी शासकीय रुग्णालय मुखेड येथे दाखल केले असता उपचार दरम्यान तरुणाचा मृत्यू झाला होता.
काही वेळ यात्रेत तणावाचे वातावरण पसरले होते. वेळीच मुक्रमाबाद पोलीसांनी बंदोबस्त लावून वातावरण शांत केले.मयत तरुणांचे वडील संतोष व्यंकटराव येरगे यांच्या फिर्यादी वरुन दि. 4 रोजी संध्याकाळी मुक्रमाबाद पोलिस स्टेशन मध्ये आरोपी प्रथमेश उर्फ अदिनाथ आंनदराव जंगमवार व मंगेश माधवराव इंगळे व आदी मित्र रा. राजुरा यांच्या विरुद्ध खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोन आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सपोनि राजेश चव्हाण हे करीत आहे

























