नवीन नांदेड – भायेगाव येथे महादेव मंदिराकडे जाणारा व शेतकरी बांधवांसाठीचा रस्ता आजपर्यंत अनेक आमदारांनी घोषणा करुनही झाला नव्हता. मात्र आमदार होताच आनंद पाटील बोंढारकर यांनी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. ना. हेमंत पाटील व आ. आनंदराव पाटील तिडके बोंढारकर यांचे सरपंच प्रतिनिधी बालाजी पा.खोसडे, व भायेगाव वाशी यांनी मानले आभार भायेगाव येथील गोदावरी नदीच्या काठी असलेल्या महादेव मंदिर नदीकाठी असलेल्या रस्त्यासाठी आ. आनंदराव बोंढारकर यांनी ४० लक्ष रुपयाचा निधी दिला होता.आज दि.४ डिसेंबर रोजी महादेव मंदिर ते भायेगाव या रस्त्याच्या कामांच्या शुभारंभ प्रसंगी नांदेड दक्षिणचे आ. आनंद बोंढारकरांचे बंधू रामराव तिडके यांच्या हस्ते कामास सुरुवात करण्यात आले यावेळी सरपंच प्रतिनिधी बालाजी पाटील भायेगावकर, उपसरपंच बालाजी कोल्हे, अशोक पा.कोचार , गंगाधर पा.खोसडे, विठ्ठल पा.खोसडे, प्रभू पा.कोल्हे, उत्तम पा.कोल्हे, पांडुरंग पा.कोचार, विश्वाबंर पा.कोचर, नारायण पा.कोल्हे, प्रभाकर पा.बो़ढारकर, गुत्तेदार अमित चिरकुले यांच्या सह गावातील जेष्ठ नागरिक व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...
























