नायगाव / नांदेड – नायगांव तालुक्यातील मरवाळी तांडा हा छोटासा परंतु सामाजिक,शैक्षणिक आणि राजकीय जाणिव वांनी परिपूर्ण असा परिसर आज अभिमानाने उजळला आहे. अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या नांदेड जिल्हा सरचिटणीस या महत्त्वपूर्ण पदावर मरवाळी तांड्याचे सरपंच, माध्यमिक आश्रम शाळा संघटनेचे जिल्हाध्यक्ष आणि मरवाळी तांडा येथील माध्यमिक आश्रमशाळेचे कार्यवाहक डॉ. मधूकर राठोड यांची निवड होताच संपूर्ण जिल्ह्यात उत्साहा चे वातावरण निर्माण झाले आहे.
काँग्रेस पक्षाशी दशकानुदशके निष्ठेने जोडलेले असलेले डॉ. राठोड यांनी ग्रामीण वाडी–तांड्यांपर्यंत पक्षाची विचारधारा पोहोचविण्यासाठी उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या प्रामाणिक कार्याची, जनसंपर्कातील प्रामाणिकतेची आणि समाज सेवेच्या दांडग्या परंपरेची दखल घेत पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यावर जिल्हा सरचिटणीस पदाची जबाबदारी सोपविली.ही बातमी समजताच सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.विशेषत:मरवाळी तांडा माध्यमिक आश्रम शाळेत तर आनंदाचा उत्स्फूर्त जल्लोष दिसून आला.
शाळेचे प्राचार्य डॉ. विजयकुमार देशमुख, शिक्षक सूर्याकांत जाधव, आनंदराव सूर्यवंशी, धोंडीबा तेलंग, संभाजी मेहेत्रे, नागनाथ येल्लूरे, सुभाष राठोड, सुरेश पवार, मुजमिल शेख तसेच पोस्ट बेसिकचे प्राध्यापक हेमंत बावणे, पांडुरंग येवले, दिलीप गोरे, उच्च माध्यमिक ज्युनिअर कॉलेजचे गणेश मारताळे कर, दिलीप माने, प्रदीप लाभशेटवार, शिवशंकर कोरे, सुभाष कदम, शिवराम राठोड, चिलवाड आणि शरद पवार ,राम पांचाळ यांच्यासह सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी डॉ. राठोड यांचा पुष्पहार घालून सत्कार केला व पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
वाडीतांड्यांतील बहुजन समाजात “आपल्या मातीतून जिल्हा पातळी वर नेतृत्व घडले” या अभिमान भावनेची लहर उसळली आहे. ग्रामीण भागातील समाजाच्या अपेक्षा, समस्यांचा निराकरण आणि समाजाभिमुख कार्याला डॉ. मधुकर राठोड आगामी काळात नवे बळ देतील, अशी आशा नायगांव तालुक्यातील ग्रामीण भागातील व वाडी तांड्या वरील नागरिकांनी यावेळी भावना व्यक्त केली आहे.

























