सोलापूर – पत्रकार भवन चौक ते जुना विजापूर नाका मार्गावर ०८ आणि ०९ डिसेंबर रोजी दुपारी ०३.०० ते रात्री ०८.०० वाजेपर्यंत सर्व प्रकारची रस्ते वाहतूक बंद राहील. पर्यायी रस्ते मार्गांच्या तपशीलांसाठी सोलापूर शहर वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
मध्य रेल्वेचा सोलापूर विभागाच्या सोलापूर-वाडी विभागात विजापूर रोड हायवे (NH-५२) वर सोलापूर येथील कंबर तलाव येथे असलेल्या सोलापूर पीएससी रोड ओव्हर ब्रिज (ROB) ब्रिज क्रमांक ४५६/४ वर शनिवार ६ डिसेंबर २०२५ ब्लॉकची वेळ ही सायंकाळी ०४:१० ते सायंकाळी ०७:१० अशी ३ तास असणार आहे. सोलापूर-हसन एक्स्प्रेस तीच्या निर्धारित वेळेच्या २० मिनिटांनी नियंत्रित केली जाईल. रविवार ७ डिसेंबर २०२५ ब्लॉकची वेळ ही रात्री ११:१५ ते दुपारी ०२:१५ अशी ३ तास असणार आहे. विजयापूर-रायचूर एक्स्प्रेस तीच्या निर्धारित वेळेच्या १ तास ४५ मिनिटांनी नियंत्रित केली जाईल. सोमवार आणि मंगळवार ८ आणि ९ डिसेंबर २०२५ ब्लॉकची वेळ ही संध्याकाळी ०४:१० ते संध्याकाळी ०७:१० अशी ३ तास असेल.
८ आणि ९.१२.२०२५ रोजी खालील गाड्या रेग्युलेशन्स होतील. यामध्ये कन्याकुमारी-पुणे एक्स्प्रेस तीच्या निर्धारित वेळेच्या २ तासांनी नियंत्रित केली जाईल. भुवनेश्वर-सीएसएमटी मुंबई कोणार्क एक्स्प्रेस तीच्या निर्धारित वेळेच्या १ तास ३० मिनिटांनी नियंत्रित केली जाईल. कलबुर्गी-दौंड स्पेशल तीच्या निर्धारित वेळेच्या ४५ मिनिटांनी नियंत्रित केली जाईल. सोलापूर-हसन एक्स्प्रेस तीच्या निर्धारित वेळेच्या २० मिनिटांनी नियंत्रित केली जाईल. बागलकोट-म्हैसूर बसवा एक्स्प्रेस तीच्या निर्धारित वेळेच्या ३० मिनिटांनी नियंत्रित केली जाईल.

























