अक्कलकोट – अक्कलकोट निवासी दत्तावतारी श्री स्वामी समर्थ महाराजांचे मूळस्थान श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या वतीने दत्त जयंती उत्सवाची सांगता आज शुक्रवारी सायंकाळी निघालेल्या श्रींच्या पालखी मिरवणुकीने झाली.
दत्तजयंती निमित्त आज दुपारी १२ ते ३ या वेळेत वटवृक्ष देवस्थानच्या वतीने देवस्थानच्या भक्त निवास येथील भोजनकक्ष येथे सर्व स्वामी भक्तांना भोजन महाप्रसाद देण्यात आले. हजारो स्वामी भक्तांनी या भोजन महाप्रसादाचा लाभ घेतला. तदनंतर सायंकाळी ५ वाजता सदगुरू श्री स्वामी समर्थांच्या पालखी मिरवणुकीची प्रारंभीक आरती पुरोहित मोहन पुजारी, मंदार पुजारी यांचे हस्ते होऊन मंदिर समितीचे चेअरमन व माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक महेश इंगळे व श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले यांचे हस्ते पालखी पूजन करून सालाबादप्रमाणे पालखी मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आले.
या पालखी मिरवणुकीत समितीचे चेअरमन महेश इंगळे, प्रथमेश इंगळे, मंदार महाराज पुजारी यांच्यासह सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त संपतराव शिंदे, महेश गोगी, उज्वलाताई सरदेशमुख, राजेश निलवाणी प्रा.नागनाथ जेऊरे, गणेश दिवाणजी, रामचंद्र समाणे, गिरीश पवार, सागर गोंडाळ, संजय पवार, नरसिंग क्षीरसागर, प्रसन्न हत्ते, किरण किरात, शशिकांत लिंबितोटे, अमर पाटील, निखिल पाटील, दिलीप हजारे, शिवशरण अचलेर, संजय बडवे, चंद्रकांत सोनटक्के, प्रसाद किलजे, अण्णा सावंत, विजय इंगळे, प्रसाद सोनार, ऋषिकेश लोणारी, स्वामीनाथ लोणारी, महेश काटकर, संतोष जमगे, श्रीशैल गवंडी, अक्षय सरदेशमुख, बाळासाहेब घाटगे, प्रदीप हिंडोळे, बंडेराव घाटगे, यांच्यासह मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद,उमरगा, तुळजापूर इत्यादी भागातून दिंडयांसह टाळकरी, विणेकरी, आदींसह हजारो स्वामी भक्त व दत्तभक्त स्वामी नामाच्या जयघोषात सहभागी झाले होते.
श्रींची पालखी मिरवणूक अक्कलकोट शहरातील प्रमुख मार्गावरून बुधवार पेठेतील श्री स्वामी समाधी मठापर्यंत व तेथून परतीस रात्री साडे नऊ वाजता पालखी मिरवणूक वटवृक्ष मंदिरात आल्यानंतर सर्व स्वामी भक्त, सेवेकरी, टाळकरी, विणेकरी, भजनकरी आदींना देवस्थानच्या वतीने शिरा प्रसाद वाटप करून दत्त जयंती उत्सवाचा सांगता समारंभ झाला.
फोटो ओळ – श्री दत्तजयंती उत्सव पालखी मिरवणूक शुभारंभ करताना मंदार महाराज पुजारी, महेश इंगळे, अमोलराजे भोसले, प्रथमेश इंगळे व इतर दिसत आहेत.

























