सोलापूर : महापालिकेच्या वतीने प्रत्येक शुक्रवारी राबविण्यात येणाऱ्या आजोरा उचल मोहिमे अंतर्गत आज शहरातील विविध भागांमध्ये विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान एकूण ८ झोनमधून १७ डंपर व ८३ खेपांद्वारे आजोरा उचलण्यात आला.
झोन 1 – जुना पुना नाका , झोन 2 – विश्रांती चौक, तुळजापूर नाका, मड्डी वस्ती, झोन 3 – गांधी नगर, शासकीय तंत्रनिकेतन परिसर , झोन 4 – विमानतळ परिसर , झोन 5 – किल्लेदार मैदान , झोन 6 – विशाल नगर, जय जालाराम नगर, शहा नगर , झोन 7 – नियोजन भवन ते पत्रकार भवन, महावीर चौक मार्ग , झोन 8 – शानदार चौक परिसर येथील आजोरा उचलण्यात आला.
महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या आदेशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त वीणा पवार व सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली. शहर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी ठेवण्याच्या उद्देशाने नियमितपणे अशा स्वच्छता मोहिमा राबविण्यात येणार आहेत. कचरा निर्दिष्ट ठिकाणीच टाकावा, स्वच्छता उपक्रमांमध्ये सहकार्य करावे आणि शहराच्या स्वच्छतेत आपला सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन महापालिका अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी केले आहे.


























