बार्शी – भारतीय डाक विभागाच्यावतीने पत्रलेखनाला प्रोत्साहन देण्यासाठी “ढाई आखर” पत्रलेखन स्पर्धेचे आयोजन सोजर इंग्लिश स्कूल बार्शी येथे दि. ४ डिसेंबर रोजी करण्यात आले. पत्रलेखनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे यावर्षी पत्रलेखनाचा विषय होता माझ्या आदर्शाला पत्र (माय रोल मॉडेल) आपल्या जीवनातील एक आदर्श व्यक्तीबद्दल व्यक्त व्हायचं होते.
आपल्या मनातील भावना लिहायच्या होत्या नक्कीच विद्यार्थ्यांनी खूप छान सुंदर अक्षरांमध्ये ते पत्र लिहिलेले आहेत. माझ्या आदर्शाला पत्र माय रोल माॕडेल या विषयावर पत्रलेखन स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेत शाळेतील ८० विद्यार्थ्यांनी उस्फुर्तपणे सहभाग नोंदवला. पत्रलेखन उपक्रमाबद्दल उदयकुमार पोतदार, राहुल जाधव यांनी मनोगत व्यक्त केली.
उपक्रम घेण्यासाठी टपाल तिकीट संग्राहक उदयकुमार पोतदार, बार्शी पोस्ट ऑफिसचे जनसंपर्क अधिकारी राहुल जाधव, शाळेचे मुख्याध्यापक संदीप पोळ, शिक्षक उपस्थित होते.

























