लहान भाऊ रुग्णालयात अस्वस्थ असून उपचाराला साथ देत नसल्याचे कळतात मोठ्या भावाने जागेवरच प्राण सोडले त्यानंतर अवघ्या पाच मिनिटानंतर लहान भावाचा उपचारादरम्यान निधन झाले ही घटना लोहारा शहरातील दत्तनगर येथे सोमवारी रात्री साडे नऊच्या सुमारास घडली दरम्यान मंगळवारी दि.7 फेब्रुवारी 2023 रोजी दोघा भावांना एकाच चितेवर अग्नी देण्यात आला.या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.तुकाराम गरड वय (73 )मारुती गरड वय(71 )हे सख्खे भाऊ शहरातील दत्तनगर येथे राहतात.
मारुती हे वाघी वारी निमित्त पंढरपूरला विठ्ठलाचे दर्शन घेऊन आले होते. प्रकृती ठीक नसल्याने त्यांना उमरगा येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.परंतु ते उपचाराला साथ देत नसल्याची माहिती त्यांचे मोठे बंधू तुकाराम यांना कळली. त्यामुळे ते अस्वस्थ झाले आणि हृदयविकाराने त्यांचे निधन झाले.त्यानंतर अवघ्या पाच मिनिटानंतर मारुती यांचे उपचार दरम्यान निधन झाले.शहरातील सार्वजनिक समशानभूमीत मंगळवारी दोघा भावांवर एका चितेवर अग्नी देण्यात आला.
या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.तुकाराम गरड यांच्या पाश्चात पत्नी,दोन मुली,सून,जावाई, नातवंडे,असा परिवार आहे.मारुती गरड यांच्या पाश्चात पत्नी,चार मुली,एक मुलगा,सून,जावाई, नातवंडे,असा परिवार आहे.