पंढरपूर – देगाव रोड येथील हॉटेल नम्रता या ठिकाणी तालुका पोलिसांनी कारवाई करीत सुमारे ११ हजार ४०० रुपयांचा देशी,विदेशी दारुचा साठा जप्त केला. या प्रकरणी एकावर गुन्हा देखील दाखल करण्यात आल्याची माहिती तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक टी.वाय.मुजावर यांनी दिली.
या कारवाई संदर्भात मुजावर यांनी सांगितले की, देगाव रोड येथील हॉटेल नम्रता या ठिकाणी अवैध दारूचा साठा असल्याची माहिती मिळाल्याने पंढरपूर तालुका पोलिसांच्या पथकाने त्या ठिकाणी जाऊन कारवाई केली. या कारवाई मध्ये एकूण ११ हजार ४०० रुपयांचा देशी विदेशी दारूचा अवैध साठा पोलिसांनी जप्त केला. या बरोबरच अमृत गावडे या व्यक्तीविरुद्ध देखील मुंबई दारूबंदी कायदा कलम ६५ प्रमाणे पंढरपूर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, सहा पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी.वाय. मुजावर, पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय तोंडले, आबा शेंडगे पोलीस कॉन्स्टेबल गुटाळ, पोलीस हवालदार सय्यद यांच्या पथकाने केली.























