सोलापूर – येथील हेरिटेज मणिधारी नगरात श्री दत्त जयंतीनिमित्त गुरुनाथ सुतार गुरुजी यांनी श्री दत्त चरित्रावर सात दिवस प्रवचन केले.मानवी जीवनावर या चरित्र श्रवणाचा कसा परिणाम होतो.हे अनेक उदाहरणे देऊन, सांसारिक व्यक्तिवर अतिशय फलदायी परिणाम होतो.हे कथारुपाने स्पष्ट केले.
या प्रवचनाचे आयोजन काशिनाथ बिराजदार यांच्या पुढाकारातून साकारले.
या प्रसंगी श्री दत्त जन्मोत्सव व पाळणा कार्यक्रमासाठी मल्लिकार्जुन नगर,संगमेश्वर नगर,कल्याण नगर,यशराज नगर येथील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम भक्तिमय वातावरणात पाळणा गीते गावून साजरा केला.
या प्रसंगी संत साहित्याचे अभ्यासक प्रा.डाॅ.भीमाशंकर बिराजदार यांनी संत साहित्यात दत्त संप्रदायाचे फार मोठे योगदान असून जीवनातील अनेक समस्यांवर उपाय देण्याचे कार्य या संप्रदायातील साधकांनी केले आहे.शाबरी देवी महिमा,दत्त गुरुमहिमा यांचा प्रभाव आज ही भक्तांना दिलासा देतो.असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार दशरथ वडतिले यांनी केले. हेरिटेज मणिधारी येथील सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष सतीश नोमूल यांचे कार्यक्रमासाठी बहुमोल सहकार्य लाभले. आठवडाभर प्रवचन केलेल्या गुरुनाथ सुतार यांचा सत्कार प्रा.डाॅ.भीमाशंकर बिराजदार यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी काशिनाथ बिराजदार, गोविंदे काका,शंकर गाडा,म्हमाणे काका ,क्षीरसागर काका,अप्पु बिराजदार इत्यादी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे नियोजन चांगल्यारितीने केले होते.हेरिटेज मणिधारीचे अल्केश पटेल यांनी सर्व भाविकासाठी प्रसाद वाटप केले.श्री दत्त आरतीनंतर कार्यक्रमाची सांगता झाली.


























