सोलापूर – मूळचा सोलापूर येथील व सध्या पुणे येथे स्थायिक असलेला उदयोन्मुख युवा गायक सार्थक बावीकर याचा श्री दत्त जयंती निमित्ताने आयोजित नाम सप्ताह २०२५ श्री दत्त मंदिर संस्थान रुईभर, जिल्हा धाराशिव येथे शास्त्रीय व भक्ती संगीताचा कार्यक्रम दिनांक २९ नोव्हेंबर २०२५ रोजी पार पडला.
आपल्या संगीत सेवेची सुरुवात सार्थक याने राग भीमपलास मधील बिरज मे धूम मचाये शाम ही मध्य लयीतली बंदिश अतिशय तल्लिंनतेने सादर करून केली. त्यानंतर त्याने आम्हा नकळे ज्ञान, घ्या दत्त दत्त नाम,अवघे गरजे पंढरपूर, धाव पाव स्वामी समर्था, माझी देवपूजा, हरी म्हणा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा अशी एकापेक्षा एक सरस व सुंदर भक्तिगीते सादर केली. त्यास संवादिनीवर धाराशिव येथील प्रा. अभिमन्यु गायकवाड, तबल्यावर श्री संजय गाडेकर व तालवाद्यावर चौरे यांनी अतिशय सुयोग्य अशी साथ केली.
कार्यक्रमाचे निवेदन धनश्री बावीकर यांनी केले. याप्रसंगी आप्पा बाबा महाराज उपस्थित होते व त्यांचे आशीर्वाद सर्व कलाकारांना लाभले. याप्रसंगी अनेक श्रोत्यांनी या भक्ती गीत कार्यक्रमाचा लाभ घेतला. मंदिर समिती तर्फे सर्व कलाकारांचा श्री बाळासाहेब जमदाडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


























