भोकरदन / जालना : भोकरदन तालुक्यातील इब्राहिमपूर येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ बाबासाहेब आंबेडकरांना शनिवारी ६ डिसेंबर रोजी इब्राहिमपूर येथे अभिवादन करण्यात आले.
दरम्यान येथील सरपंच रामसिंग डोभाळ यांच्या हस्ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी झालेल्या कार्यक्रमास ग्रामस्थ अधिकारी दीपक कोळी, मुख्याध्यापक थुटे सर शंकर पगारे, शांतीलाल पगारे, सुदाम पगारे, दिलीप साळवे, सचिन पगारे व ईश्वर पगारे, महादू गायकवाड, नाना खरात, मिथुन पगारे, कैलास पगारे, विकास पगारे किसन जारवाल, गजानन दांडगे, कैलास पगारे यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते,
























