नायगाव / नांदेड – भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न महा मानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नरसी येथे भव्य महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
फुले–शाहू–आंबेडकर क्रांती मंचाचे संस्थापक अध्यक्ष चिटमोगरा येथील सामाजिक कार्यकर्ते भास्कर भेदेकर यांच्या संकल्पनेतून दरवर्षीप्रमाणे या ही वर्षी या उपक्रमाचे यशस्वी आयोजन झाले.
नरसीतील मुख्य चौकात आयोजित या शिबिरासाठी नंदीग्राम ब्लड बँक, नांदेड यांच्या पथकाने सहकार्य केले. डॉ. आदिती मूंडे, राम महाजन, शिवम जबडे, आदित्य तोंडे तसेच पथकातील इतर सदस्यांनी शिबिर सुरळीतपणे पार पडण्यासाठी मोलाची सेवा बजावली.
याप्रसंगी रामतीर्थचे पोलीस उपनिरीक्षक शिवाजी नरवाडे,नरसी बिटचे जमादार चंद्रमुणी सोनकांबळे, नरसी तील प्रसिद्ध उद्योगपती राजेंद्र भगवानराव भिलवंडे, पोलीस कॉन्स्टेबल संजय शिंदे , तसेच विविध राजकीय,सामाजिक कार्यकर्त्यां नी मोठ्या उत्साहाने रक्तदान केले.एकूण ४० ते ८० रक्तदात्यांनी सहभाग नोंदवत मानव सेवेचा मोलाचा संदेश दिला.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी फुले– शाहू आंबेडकर क्रांती मंचाचे कार्यकर्ते नागसेन जिगळेकर, सुनिल कांबळे, गौसभाई शेख,किशोर वाघमारे, सुर्यकांत भेदे, किरण इंगळे, संदीप सोन कांबळे, इंद्रजित डूमने, निळकंठ तरटे, राहुल गायकवाड, किरण डूमने आदींनी अथक परिश्रम घेतले.
संस्थापकअध्यक्ष भास्कर भेदेकर यांच्या पुढाकारातून गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक जाणीवेचे असंख्य उपक्रम राबविले जात आहेत.रक्तदान शिबिराच्या यशस्वी आयोजनामुळे नरसी परिसरात भेदेकर यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.


























