परभणी – प्रभुकृपा माध्यमिक विद्यालय वाघी बोबडे येथे घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी म्हणजेच महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक संतोष साखरे हे उपस्थित होते तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद साळवे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन सत्यजित वसमतकर सर यांनी केले तसेच या कार्यक्रमाच्या दरम्यान अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतामधून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कारकिर्दीवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महापुरुषांना किंवा त्यांच्या कार्याला कुठल्याही धर्म किंवा जातीपुरतं मर्यादित न ठेवता त्यांच्या कार्यांचा विस्तार करावा कारण त्यांचे काम समाजातील सर्व घटकांवर प्रभाव पाडणारे काम आहे असे आवाहन केले.
या कार्यक्रमाला उद्धव ठोंबरे सर, धुळे सर पाटील सर, सरगर सर, गलांडे सर, मगर सर मुंडे मॅडम तसेच संदीप रोहिनकर ,शिवदास रोहिनकर आदींची उपस्थिती होती.

























