फर्दापूर / संभाजीनगर – छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्गावर अजिंठा घाटात दोन तास ट्रॅफिक जाम छत्रपती संभाजीनगर हुन जळगाव जात असलेल्या कंटेनर क्रमांक जी.जे 27 टि डी 4390 यांचे ब्रेक निकामी झाले असल्याने घाटात रस्त्यावर आडवा झाला होता.
हि घटना शनिवारी रात्री सात वाजता झाली असल्याने दोन तास घाटात ट्राफीक जाम झाले होते यामुळे जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पाहण्यासाठी आलेले पर्यटक, रुग्ण, तसेच नोकरदार, प्रवाशी याठिकाणी अडकून पडले होते.
यामध्ये सध्या कडाक्याची थंडी त्यामध्ये रात्रीचा अंधार डोंगर असल्याने हिंस्र प्राणी यांची भिंती यांसारख्या असंख्य संकटांना प्रवाशी या घाटातून प्रवास करत असुन त्यामध्ये घाटात ट्राफीक जाम होते असते तरी या ठिकाणी मंत्री आमदार खासदार रुग्ण विद्यार्थी बऱ्याच वेळा अडकून राहतात तरी महाराष्ट्र सरकार यांचा वनविभाग आणि बांधकाम विभाग यांचा काही वाद संपत नसुन इकडे वाहतूकदार, रुग्ण, विद्यार्थी देशी विदेशी पर्यटक, यांना त्रास किती दिवस सहन करावा लागत आहे याकडे वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष घातले पाहिजे.
यावेळी फर्दापूर पोलिस स्टेशन चे पोलिस कर्मचारी फिरोज तडवी यांनी तात्काळ सर्व वाहतूक सुरळीत करण्यात आली


























