सोलापूर -पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने मैदानी स्पर्धेत चार पदकांची कमाई केली असल्याचे विद्यापीठाचे स्पर्धा समन्वयक बाळासाहेब वाघचवरे यांनी सांगितले.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत सोलापूरच्या धावपटूंनी शुक्रवारचा दिवस गाजविला. संगमेश्वर महाविद्यालयाच्या विनीत दिनकरने १०० मीटर धावण्याची शर्यत १०.६८ सेकंदात जिंकत वेगवान धावपटूचा मान मिळवला. त्यापाठोपाठ दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयाच्या हर्ष राऊत यांनेही १०.८२ सेकंदात हीच शर्यत पूर्ण करीत रौप्य पदकाची कमाई केली. या खेळाडूंना विद्यापीठाचे प्रशिक्षक प्रा. डॉ. अशोक पाटील, प्रा. डॉ.किरण चॊकाककर व प्रा. धनंजय देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले.
गतवर्षी उंच उडीमध्ये रौप्य पदकावर समाधान मानावे लागलेल्या सांगोला महाविद्यालयाच्या सुजाता बाबर हिने यंदा आपली कामगिरी सुधारीत सुवर्णपदकाची कमाई केली. तिने १.५१ मीटर उंच उडी मारली. तसेच पंधराशे मीटर धावण्याच्या शर्यतीत छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालयाच्या दाजी हुबाळे यास ब्राँझ पदकावर समाधान मानावे लागले. त्यांनी ही शर्यत चार मिनिटात पूर्ण केली.
खेळाडूंच्या कामगिरीचे कौतुक


























