पिलीव – माळशिरस तालुक्यातील निमगाव ते गारवाङ हा रस्ता राज्य मार्ग असुन या रस्ताचे काम अकलूज येथील सार्वजनिक बांधकाम खात्या अंतर्गत 2023 व 202४ या सालात खङीकरण व ङांबरीकरण्याचे काम झाले .निमगाव गावापासून ७ किलोमीटर पर्यंत रस्त्यावर मोठे खङ्ङे पङले आहेत.
या रस्त्यावरून गारवाङ ,चांदापुरी ,तरंगफळ पठाणवस्ती ,आदि गावाला जाणारा नकाशावरील प्रमुख रस्ता आहे. या परिसरात ऊसाचे क्षेञ मोठे असल्याने ऊस वाहतुक मोठ्याप्रमाणात असल्याने शाळेत जाणाऱ्या मुले व ग्रामस्था साठी या रस्त्यावरून प्रवास करणे धोकादायक आहे .रस्त्यावर मोठ मोठी झाङे आली आहेत. अकलूज येथील बांधकाम विभागाकङे या बाबत रितसर तक्रार देऊनही आधिकारी याची दखल घेत नाहीत .
सबंधीत ठेकेदाराने या रस्याची देखभाल करण्याचे गरजेचे असताना ते करीत नाहीत. नवीन केलेल्या रस्त्याचे काम निकृष्ट पध्दतीने झाल्याने बांधकाम खात्या विरूध ग्रामस्थांचा अंदोलना करण्याचा इशारा दिला आहे. फोटो _ निमगाव _ गारवाड रस्त्याची दुरावस्था.


























