सोलापूर – प्रवाशांच्या मागणीनुसार अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी पुणे-बेंगळुरू दरम्यान सोलापूर विभागाद्वारे विशेष गाड्या चालवणार आहेत. यामध्ये पुणे-बेंगळुरू विशेष ट्रेन ०६ डिसेंबर रोजी सायंकाळी ०७:०० वाजता पुण्याहून निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ११:१५ वाजता केएसआर बेंगळुरूला पोहोचेल. बेंगळुरू-पुणे विशेष ट्रेन ०७ डिसेंबर रोजी दुपारी १:०० वाजता केएसआर बेंगळुरूहून निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०५:०० वाजता पुण्यात पोहोचेल.
दौंड, सोलापूर, कलबुरगि, वाडी, गुंटकल, धर्मावरम, येलहंका आणि बेंगळुरू कॅन्टोन्मेंट असे या गाड्यांचे थांबे असतील तर १६ तृतीय श्रेणी वातानुकूलित आणि २ सामानासह ब्रेक व्हॅन आणि जनरेटर कार असे १८ कोचची रचना आहे.
बेंगळुरू-पुणे स्पेशल ०७ डिसेंबर रोजी सायंकाळी ०७:३० वाजता केएसआर बेंगळुरूहून निघेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी ०२:३० वाजता पुण्यात पोहोचेल. पुणे-बेंगळुरू स्पेशल ०८ डिसेंबर रोजी दुपारी ०३:३० वाजता पुण्यातून निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०९:३० वाजता बेंगळुरू कॅन्टोन्मेंटला पोहोचेल.
दौंड, कुर्डुवाडी, सोलापूर, कलबुरगि, शाहबाद, यादगीर, कृष्णा, रायचूर, मंथ्रालयम रोड, अडोनी, गुंटकल, अनंतपूर, धर्मावरम, हिंदूपूर, येलहंका आणि बेंगळुरू कॅन्टोन्मेंट असे थांबे असतील तर १ एसी II-टायर, २ एसी III-टायर, ९ स्लीपर क्लास, ३ जनरल सेकंड क्लास आणि २ गार्ड कम ब्रेक व्हॅन १७ कोच अशी गाड्यांची रचना आहे.
















