सोलापूर – विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबर शारीरिक विकासासाठी दि.१ ते ६ डिसेंबर या कालावधीत प्रशालेत वार्षिक क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य अमरसिंह पाटील यांच्याहस्ते मैदानाचे पुजन करून करण्यात आले.
यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक अजित हेरले, पर्यवेक्षक धैर्यशील पवार आदींची उपस्थिती होती. या क्रीडा सप्ताह अंतर्गत कबड्डी,खोखो,रिले शंभर मीटर धावणे इत्यादी सांघिक खेळांचे तसेच धावणे, बुद्धिबळ, थाळीफेक, भालाफेक, गोळाफेक इत्यादी वैयक्तिक मैदानी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन खेळाचा मनमुराद आनंद लुटला. हा क्रीडा सप्ताह यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षकांनी व शिक्षकेतर वृंदनी परिश्रम घेतले. यावेळी शिक्षक, शिक्षकेतर वृंद,शशांक माने, दत्तात्रय कांबळे, मोहन शिंदे, अतिश गाडे, जैनुद्दीन दरवेशी, दादा साठे, अमर माने आनंद गाडे, धिरज माने हे माजी विद्यार्थी उपस्थित होते.


















