पंढरपूर – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पंढरपूर येथे ॲड.महेश कसबे मित्र मंडळाच्या वतीने व आर.पी.आय नेते दीपक चंदनशिवे यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिराचे आयोजन येथील स्मारक सभागृहात करण्यात आले होते.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केल्यानंतर या रक्तदान शिबिराचे उद्घाटन माजी आमदार प्रशांत परिचारक, मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्या करण्यात आले.
सर्व महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी याचबरोबर पंढरपुरात भरणाऱ्या यात्रांमध्ये कायम स्तुत्य उपक्रम राबवून एडवोकेट महेश कसबे मित्र मंडळाने सामाजिक कार्यात मोठे योगदान देण्याचे काम केले आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला भीमसैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
याप्रसंगी आरपीआयचे जितेंद्र बनसोडे, मुकुंद मागाडे, आर.पी कांबळे, भाजपा शहराध्यक्ष रोहित पानकर, एडवोकेट राजेश चौगुले, एडवोकेट अमरसिंह देशमुख, आय.एम कडगे, काकासाहेब केंगार, शैलेश आगावणे, अमित कसबे, सुधाकर बंदपट्टे, राहुल चंदनशिवे, सुधीर सोनटक्के, सुनील पवार, बुद्धभूषण चंदनशिवे, विकी कसबे, श्रीनाथ बाबर, अनिल माने, अक्षय आठवले, एकनाथ वाघमारे, पिंटू कांबळे, ब्रह्मदेव वाघमारे, अमर सूर्यवंशी, अजिंक्य ओव्हाळ, दीपक साबळे, बाळासाहेब सर्वगोड उपस्थित होते.
फोटो ओळी : पंढरपूर – येथील रक्तदान शिबिर उद्घाटन प्रसंगी माजी आमदार प्रशांत परिचारक, आरपीआय नेते दिपक चंदनशिवे, एडवोकेट महेश कसबे, मुख्याधिकारी महेश रोकडे.


















