बार्शी – छत्रपती क्रीडा शिक्षण व समाजसेवी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मोहन ठोंगे यांच्या वाढदिवसानिमित्त दोन्ही प्रशालेमध्ये क्रीडा सप्ताह आयोजन करण्यात होते.
याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटन करताना संस्थेच्या सचिवा सौ तेजस्विनीताई ठोंगे, बार्शी नगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी बावकर, पर्यवेक्षक शिंदे यांच्या उपस्थित सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व कबड्डीच्या मैदानाचे उद्घाटन करुन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
प्रस्ताविक दत्त प्राथमिक विद्यामंदिरचे मुख्याध्यापक श्रीकांत कुंभारे यांनी केले. प्रमुख पाहुण्याचे भाषणामध्ये बावकर यांनी शालेय परिसर,वातावरण पाहून आनंद झाला तसेच शाळेचा शैक्षणिक दर्जा उत्कृष्ट असल्याचे समाधान व्यक्त केले व संस्थेचे अध्यक्ष मोहन ठोंगे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमास शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती संगीता काळे, अरुणा मठपती, श्रीमती ललिता चव्हाण, कसबे मॅडम ,सौ.शितल पाटील, सुनिल लंगोटे, मंगेश मोरे, चंद्रकांत लोखंडे, राहूल ठोंगे, संदीप भोरे, श्रीकांत चव्हाण उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संतोष ठोंबरे यांनी मानले.

















