सोलापूर – सातरस्ता मोदीखाना येथील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयातील ४ खेळाडूंनी आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ संघात स्थान मिळविले आहे.
व्हॉलीबॉल विद्यापीठ संघात शारदा बुक्या व प्रगती शिवपूजे यांची तर कबड्डी विद्यापीठ संघात ज्ञानेश्वरी खोसे व वैष्णवी राजमाने यांची निवड झाली आहे. हे संघ स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे होणाऱ्या २७ व्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव स्पर्धेत सहभागी होणार आहेत. यासोबतच वैष्णवी खोसे हिने जिल्हा कबड्डी संघात स्थान पटकाविले आहे. या खेळाडूंना महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा. भक्तराज जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. खेळाडूंच्या या यशाबाबत रयत शिक्षण संस्थेच्या मध्य विभागाचे चेअरमन संजीव पाटील, प्राचार्य डॉ. सुरेश ढेरे यांनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
——-
फोटो ओळ: यशस्वी खेळाडूंसमवेत प्राचार्य डॉ. सुरेश ढेरे, प्रा. भक्तराज जाधव, प्रा. संतोष मारकवाड
















