माळशिरस – परभणी येथे झालेल्या राज्यस्पर्धेत सोलापूर जिल्ह्याच्या संघाने आक्रमक खेळ करीत संभाजीनगरच्या संघाला पराभूत करीत अजिंक्यपद पटकाविले .या जिल्ह्याच्या संघातून माळशिरसच्या अमीर काझी याची आठव्यांदा राज्य संघाच्या कर्णधार पदी तर विनायक नाळे याची राज्य संघात खेळाडू म्हणून निवड झाली
परभणी येथे ३९ व्या राज्यस्तरीय शूटिंगबॉल अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा संपन्न झाली.या स्पर्धेत सोलापूर जिल्हा पुरुष संघाने आक्रमक खेळ करीत अंतिम सामन्यात संभाजीनगर संघाचा पराभव करीत प्रथम क्रमांक मिळवला आहे. संघात शोएब बेगमपुरे (कर्णधार), अमीर काझी, गणेश मोरे, फैजान इनामदार, अजय कांबळे, विनायक नाळे, अमन शेख, फरहान लालकोट, ओंकार चक्रनारायण, हीरो शेख, अफरोज काझी, यश वैजनाथ रब्बेवार या खेळाडूंनी सहभाग घेतला होता .
जिल्हा संघाने ठाणे ,सांगली,संभाजीनगर या संघाना पराभूत करीत अजिंक्यपद पटकाविले या जिल्हा संघातील अमीर काझी याची राज्य संघाच्या कर्णधार पदी निवड करण्यात आली.तर उत्कृष्ट खेळ करून विनायक नाळे याने संघास विजेतेपद मिळवून दिले त्याची राज्य संघात निवड करण्यात आली .शुटींग बॉलची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माळशिरस मधील खेळाडूंची निवड झाल्याबद्दल सर्वस्तरातून कौतुक होत आहे.तसेच राज्य शुटींग बॉल संघटनेने यशस्वी खेळाडूंचे अभिनदन करून अखिल भारतीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या















