सोलापूर – नॅब संचलित स्वामी विवेकानंद प्रशाला एमआयडीसी येथे क्रीडा सप्ताहास सुरुवात झाली. याचे उद्घाटन शहर कुस्तीगीर परिषद उपाध्यक्ष प्रा.नरसिंह असादे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक डॉ. हणमंत नारायणकर होते. प्रारंभी प्रमुख अतिथींच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमा पूजन करण्यात आले . या क्रीडा सप्ताहात कबड्डी, खो-खो, हॉलीबॉल, तसेच ॲथलेटिक्स स्पर्धा प्रशालेत घेण्यात येणार आहेत.
प्रमुख अतिथी प्रा. असादे यांनी मनोगतात क्रीडा स्पर्धांचे महत्व, खेळातील उत्तम संधी, खेळामुळे आरोग्य कसे उत्तम राहते याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी सहशिक्षक उज्वला हिंगमिरे ,संजय राठोड, गणपती कोळी, खंडू शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडाशिक्षक सुभाष माने यांनी केले. मा. मच्छिंद्र सपताळे यांनी आभार मानले.
















