सोलापूर – मागील काही दिवसापासून सोलापूर जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला आहे, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असताना त्याचा परिणाम जनावरांच्या आरोग्याचा होऊ शकतो, त्यामुळे हिवाळ्यात जनावरांच्या आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
जिल्ह्यात जवळपास पाच लाखापेक्षा अधिक गाय, बैल, म्हैस, व तसेच शेळ्या यांची संख्या मोठ्या आहे. शहरात मागील काही दिवसापासून थंडीचा कडाका माणसांप्रमाणे मुक्या जनावरांना देखील या गारव्याचा त्रास होतो. हे लक्षात घेता बाळे येथील निसर्ग प्रेमी दीपक करकी, ऋषिकेश हरसुरे यांनी थंडीपासून मुक्या जीवा ला मायेची ऊब मिळावी म्हणून गोठ्या मध्ये जाऊन जनावरांचे रक्षण करायचेअसेल तर सर्वप्रथम थंडीपासून त्याचा बचाव करणे महत्त्वाचा आहे. गोट्यात गाय. बैल. म्हैस या मुक्या जनावरांना ब्लॅंकेट घालून गरमी उपलब्ध केली आणि जनावरांच्या रक्षणासाठी जनजागृती करण्यात आले..
*🔲याची केली जनजागृती…*
लहान वासरे शेळ्या याचे सध्याच्या थंडी पासून संरक्षण करणे गरजेचे आहे.
गोट्याला बारदान शेडनेटचे पडदे लावावेत. गोट्यामध्ये उष्णता टिकून राहण्याची बल्पचा वापर करावा.
शक्य झाल्यास शेकोटी पेटवावी थंडीपासून बचाव करता येईल..*
*🔲सध्या शहरात थंडीचा*
कडाका वाढला आहे, मुक्या जनावरांना थंडीपासून संरक्षण देणे गरजेचे आहे
माणसांप्रमाणे जनावरांना देखील थंडीचा त्रास होतो याकरता आम्ही थंडीच्या संरक्षणासाठी मायेची ऊब मिळावी.*
















