सोलापूर – महाराष्ट्र साहित्य परिषद उत्तर सोलापूर शाखेच्या संस्थापक अध्यक्ष आणि माजी आमदार स्व.निर्मलाताई ठोकळ यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा उत्तर सोलापूर शाखेची नुकतीच पुनर्रचना करण्यात आली. त्यात सचिन ठोकळ यांची शाखेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सोलापूर जिल्हा प्रमुख पद्माकर कुलकर्णी यांच्या उपस्थितीत उत्तर सोलापूर शाखेच्या बाळे येथील कार्यालयात सदरची बैठक पार पडली. या बैठकीत शाखेच्या अध्यक्षपदी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सहायक कुलसचिव तथा मराठी भाषा दक्षता अधिकारी डॉ. शिवाजी शिंदे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
या बैठकीत शाखेचे इतर पदाधिकारी निवडण्यात आले. उपाध्यक्ष – शिल्पा ठोकळ, कार्याध्यक्ष – उज्ज्वला साळुंखे, प्रमुख कार्यवाह – संतोष काळुंके, कार्यवाह – डॉ.नितीन आवताडे, सहकार्यवाह – पुनम पाटील, कोषाध्यक्ष शिवाजी आतकरे, यांची तर कार्यकारणी सदस्य म्हणून सारंग पाटील, आशा भोसले, आशा ठोकळ, अब्दुलकादर मुजावर, विद्या पुजारी, निवृत्ती दळवी, हभप.ज्योती चांगभले, स्वाती गाजरे आदींची निवड करण्यात आली. मार्गदर्शक म्हणून पद्माकर कुलकर्णी, हभप सुधाकर इंगळे महाराज यांचीही यावेळी निवड करण्यात आली.
सदर कार्यकारणी ही २०२५ ते २०३२ या कालावधीसाठी करण्यात आली असून नूतन पदाधिकारी व कार्यकारणी सदस्यांनी साहित्य विषयक विविध कार्यक्रमांचे आयोजन व नियोजन करण्याचा मनोदय यावेळी व्यक्त करण्यात आला. निवड झालेल्या नूतन पदाधिकारी व कार्यकारणी सदस्यांचे अभिनंदन यावेळी करण्यात आले.

























