पिलीव – माळशिरस तालुक्यातील शेख कोळपे,शेख वस्ती(चांदापुरी ) या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी नितीन विष्णू सरक यांची निवड झाल्याबद्दल माळशिरस तालुक्यातील चांदापुरी येथील शेतकरी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या वतीने संस्थापक चेअरमन भजनदास चोरमले यांच्या हस्ते अध्यक्ष नितीन सरक यांचा यशोचित सन्मान सन्मान करण्यात आला .
यावेळी चेअरमन भजनदास चोरमले .शाळा व्यवस्थापन समितीचे नूतन अध्यक्ष नितीन सरक, मॅनेजर प्रदीप मदने ,बापू पुकळे ,दत्तू पाटील, माजी उपसरपंच संतोष कोपनर, बापू करडे ,प्रसाद मदने,अमोल कांबळे ,सागर शिंगाडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी शेख कोळपे वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शाळा व्यवस्थापन पदी निवड झाल्याबद्दल व शेतकरी पतसंस्थेने केलेल्या सत्कार बद्दल अध्यक्ष नितीन सरक यांनी चेअरमन भजनदास चोरमले व संचालक मंडळाचे व प्रशासकीय कर्मचाऱ्यांचे हार्दिक आभार व्यक्त केले .
शेख कोळपे वस्ती जिल्हा परिषद शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितीन सरक यांचा सत्कार करताना चेअरमन भजनदास चोरमले बापू पूकळे, दत्तू पाटील संतोष कोपनर ,मॅनेजर प्रदीप मदने बापू करडे प्रसाद मदने,अमोल कांबळे ,सागर शिंगाडे आदी मान्यवर.


























