राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांची कारखाली चिरडून हत्या करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
विरोधात बातमी प्रकाशित झाल्याचा संताप मनात धरून आरोपी पंढरीनाथ अंबेरकर यांनी आपल्या स्वतःच्या चार चाकी वाहनाने पत्रकार वारीशे यांच्या दुचाकीला जोराची धडक देऊन त्यांना आपल्या कारखाली घेऊन चिडले. यामध्ये वारीशे यांचा मृत्यू झाला असून या प्रकरणी आरोपी पंढरीनाथ अंबेरकर यांच्या विरोधात पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा , या प्रकरणाचा तातडीने तपास करून त्वरित न्यायालयात दोषारोपत्र दाखल करावेत आणि हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालून आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा करावी आणि भविष्यात अशा घटना घडणार नाहीत यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...