Sunday, September 13, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

५ लाख लोकांच्या तोंडचे पाणी कंत्राटदारासह अधिकाऱ्यांनी पळवले; वॉटर ग्रीड घोटाळ्यावर लोणीकर आक्रमक

तरुण भारतbyतरुण भारत
December 12, 2025
in marathwada
0
0
SHARES
29
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

परतूर / जालना -महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात आज १७३ गाव वॉटर ग्रीड योजना परतूर, ९५ गाव वॉटर ग्रीड योजना मंठा आणि १२० गाव सुधारित पाणीपुरवठा योजनेतील मोठ्या प्रमाणातील भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून प्रचंड खळबळ उडाली. भाजपचे आमदार आणि माजी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी सभागृहाच्या लक्षात आणून दिले की या बहुमूल्य योजनेत कंत्राटदार व काही अधिकाऱ्यांनी संगनमत करून शासनाची गंभीर फसवणूक केली आहे. या योजनेत शेकडो कोटींचा निधी खर्च झाला असतानाही अनेक गावांमध्ये आजही पाणीपुरवठा सुरू नसल्याचे त्यांनी नमूद केले.

लोणीकर यांनी सांगितले की १७३ आणि ९५ गावांसाठी मंजूर झालेल्या या वॉटर ग्रीड योजनेत काम पूर्ण झाल्यानंतर कंत्राटदाराने सदरील योजना तीन वर्षे चालवावी व त्यानंतर अंतिम बिल देण्यात यावे असे कंत्राट देतानाच नमूद केलेले असताना अधिकाऱ्यांनी कंत्राटदार अशी संगणमत करून काम पूर्ण झालेले नसताना २६ कोटी रुपयांचे अंतिम बिल कंत्राटदाराने देऊन टाकले. मात्र त्या काळात एकाही गावात पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा सुरू झालेला नव्हता. काही गावांमध्ये तर पाइपलाइनची चाचणीदेखील पूर्ण झालेली नव्हती आणि काही ठिकाणी पाइपलाइन केवळ अर्धवट अवस्थेत टाकण्यात आली होती. या परिस्थितीत एवढे मोठे बिल कसे मंजूर झाले, याबाबत त्यांनी गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

या योजनेची अंमलबजावणी तांत्रिकदृष्ट्याही अतिशय ढिसाळ झाल्याचे त्यांनी सांगितले. मुख्य जलकुंभापासून गावांपर्यंत पाणी सोडताना अनिवार्य असलेली हायड्रोलिक टेस्ट केवळ एका ठिकाणी घेण्यात आली आणि उर्वरित गावांची वितरण व्यवस्था कोणत्याही प्रकारच्या चाचणीविना सुरू झाल्याचे त्यांनी म्हटले. गावोगाव टाकण्यात आलेल्या पाइपलाइन केवळ दीड फूट खोलीवर बसविल्यामुळे शेतातील मशागतीदरम्यान त्या वारंवार फुटत आहेत. पाइप फुटल्याने पाण्याचे मोठ्या प्रमाणात गळती होते आणि पाणीपुरवठा खंडित होतो.

काही ठिकाणी गळतीमुळे दूषित पाणी पाईपमध्ये मिसळल्याने लोकांना गॅस्ट्रो आणि पोटाच्या तक्रारींचा त्रासही झाला आहे. लोणीकर यांनी स्पष्ट सांगितले की, “ही संपूर्ण योजना तांत्रिकदृष्ट्या दोषपूर्ण असून सुरुवातीपासूनच अत्यंत निष्काळजीपणे काम केले गेले आहे. दीर्घकाळ कार्यक्षम राहणारी योजना निर्माण करणे हा उद्देश असूनही अधिकाऱ्यांनी मात्र आर्थिक स्वार्थाला प्राधान्य दिले.”

या प्रकरणात कंत्राटदाराने अपूर्ण काम प्रगत झाल्याचे दाखवण्यासाठी खोटी कागदपत्रे सादर केली आणि जीवन प्राधिकरणातील काही अधिकाऱ्यांच्या मदतीने मोठ्या प्रमाणात बिल उचलले असल्याची गंभीर बाबही त्यांनी सभागृहात मांडली. आजही १७३ गाव वॉटर ग्रीड मधील ५२ गावांमध्ये तर ९५ वॉटर ग्रीड मधील २७ गावांमध्ये आजही पाणीपुरवठा पूर्णपणे बंद आहे. अनेक गावांमध्ये पाइपलाइन फुटल्याने अनियमित पाणीपुरवठा होत आहे आणि काही ठिकाणी मागील काही महिन्यांपासून पूर्णतः ठप्प झालेला आहे. यामुळे गावकऱ्यांना विहिरीचे आणि नाल्याचे पाणी पिण्याची वेळ आली असून अनेक गावांमध्ये आरोग्य समस्यांचे प्रमाण वाढले आहे.

लक्षवेधी सूचनेदरम्यान लोणीकर यांनी हेही सांगितले की एमजेपीच्या अधिकाऱ्यांनी योजना बंद असण्याचे कारण वीज कनेक्शन खंडित झाल्यामुळे ती सुरू राहू शकली नाही असे विधानसभेला सांगितले. मात्र हे कारण पूर्णपणे खोटे असून अधिकाऱ्यांनी मंत्री महोदयांसह सभागृहाची दिशाभूल केलेली आहे. सदरील योजना वीज कनेक्शन खंडित झाल्यामुळे बंद नसून अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे बंद असल्याचा आरोप आमदार बबनराव लोणीकर यांनी केला. आमदार बबनराव लोणीकर यांच्या पुढाकारातून योजनेच्या बचतीमधून २ कोटी रुपये तर ग्रामपंचायतीकडून ५० लाख रुपयांची वसुली करून अडीच कोटी रुपयांचे वीज बिल भरण्यात आले होते. मागील काळात झालेली अतिवृष्टी च्या पार्श्वभूमीवर वीज खंडित करण्यात आली होती परंतु आमदार बबनराव लोणीकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क करून तात्काळ अधीक्षक अभियंता यांना सूचना करत दुसऱ्याच दिवशी वीज सुरळीत चालू करण्यात आले होते त्यामुळे अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचाराबरोबर मंत्र्यासह सभागृहाला खोटं सांगण्याची मुजोरी देखील करण्यास सुरुवात केली आहे असे देखील आमदार बबनराव लोणीकर यावेळी म्हणाले.

आमदार लोणीकर यांनी या संपूर्ण प्रकरणात जीवन प्राधिकरणाचे मुख्य सचिव, सदस्य सचिव, मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता तसेच कार्यकारी आणि उपअभियंत्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून कंत्राटदाराला मदत केल्याचा आरोप केला. त्यांनी या अधिकाऱ्यांवर तातडीने चौकशी करून त्यांचे निलंबन करावे, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत आणि कंत्राटदार कंपनीचा परवाना रद्द करून तिला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी केली. त्यांनी भ्रष्टाचारामुळे शासनाला बसलेला आर्थिक फटका वसूल करून घेणे आवश्यक असल्याचेही सभागृहासमोर मांडले. या प्रकरणावर उत्तर देताना पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी या योजनेतील अनियमिततेची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र समिती नेमली जाईल असे सांगितले. अपूर्ण कामे, बिल मंजुरीतील गैरप्रकार, तांत्रिक त्रुटी आणि कंत्राटदार कंपनीची जबाबदारी यांची पाहणी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, तसेच पुढील २ दिवसात वीज कनेक्शन मुळे बंद असलेला पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल असे त्यांनी विधानसभेला आश्वासन दिले. त्यांनी पुढील आठ ते दहा दिवसांत चौकशीची प्राथमिक पावले उचलली जातील असेही सांगितले.

या चर्चेदरम्यान विरोधकांसह अनेक सदस्यांनी या प्रकरणात अत्यंत गंभीर घोटाळा झाल्याचे नमूद केले आणि सरकारने तातडीने कडक कारवाई करावी अशी मागणी केली. या मुद्द्यामुळे सभागृहात काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. योजनेतील भ्रष्टाचार, अपूर्ण कामे, तांत्रिक त्रुटी आणि खोटी माहिती देऊन सभागृहाची दिशाभूल केल्याचा आरोप यामुळे सरकारवर दडपण वाढले आहे. संपूर्ण प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधी, स्थानिक नागरिक तसेच पाणीपुरवठ्यावर अवलंबून असलेली गावे या सर्वांचे लक्ष आता चौकशीच्या निकालाकडे लागले आहे. भ्रष्टाचाराची रक्कम वसूल करून जबाबदारांवर कठोर कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post Views: 101
Previous Post

अतिवृष्टीनंतर आता चोरट्यांचा डल्ला; शेतातून काढणीला आलेला कापूस वेचून नेला

Next Post

माजी मंत्री आ.बबनराव लोणीकर यांच्या सूचनेवरून सोयाबीन खरेदी केंद्र सुरू

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

माजी मंत्री आ.बबनराव लोणीकर यांच्या सूचनेवरून सोयाबीन खरेदी केंद्र सुरू

ताज्या बातम्या

फेब्रुवारी अखेर पासून टोलनाक्यावर नो स्टॉप #viral #news #marathinews #latestnews

September 12, 2026

गुन्हे शाखेने केली महत्वाची कामगिरी

September 12, 2026

जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळातर्फे २० सप्टेंबरपासून बौद्धिक व्याख्यानमाला #solapurnews #news

September 12, 2026

पोलिसांना काळजी कर्मचाऱ्यांच्या मनस्वास्थ्याची #viral #solapurnews #news #marathinews

September 12, 2026

सोलापुरात महिलांसाठी वस्त्रोद्योगात रोजगाराची संधी #solapurnews #viral #news #latestnews#maazsolapur

September 12, 2026

बापरे दुचाकीच्या साध्या पिशवीत मिळाला चक्क दोन लाखांचा गांजा #viral #solapurnews #news #latestnews

September 12, 2026

३९ वर्षीय डॉक्टरचा सोलापूरच्या घरात आढळला मृतदेह

September 12, 2026

फेब्रुवारी अखेर पासून टोलनाक्यावर नो स्टॉप #viral #marathinews #news

September 12, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1198084

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!