जेष्ठ अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी राष्ट्रवादी पक्षाला राम राम ठोकून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टी चे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.
प्रिया बेर्डे ह्या मराठी हिंदी चित्रपट सृष्टीतल्या आघाडीच्या अभिनेत्री आहेत.नाट्य सृष्टीत ही त्यांनी आपला ठसा उमटवला आहे.सध्या धनंजय माने इथेच राहतात हे त्यांचे नाटक रंगभूमीवर गाजत आहे.कोरोना महामारी च्या काळात ही त्यांनी कलावंताच्या साठी अनेक कामे केली होती.
आपण भारतीय जनता पार्टीत काम करताना आपल्या कामाचा ठसा नक्की उमटवू असे त्यांनी सोलापूर तरुण भारत शी बोलताना सांगितले.पक्षाने जे काम सांगितले त्याचे मी नक्की सोने करेन असे ही त्या म्हणाल्या