सोलापूर – संन्मती ज्ञान प्रसारक मंडळ संचलित श्री नवलबाई फुलचंद शहा कोठारी हायस्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन हुतात्मा स्मृती मंदिर येथे अत्यंत उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव श्री अजितनाथ उपाध्ये सर, उद्घघाटक म्हणून उपशिक्षणाधिकारी श्री विठ्ठल ढेपे तर प्रमुख पाहुणे म्हणून उपशिक्षणाधिकारी श्री.प्रकाश नागोरे साहेब, संस्थेचे विश्वस्त सौ .सुशीला उपाध्ये ,श्री.देवेंद्रजी शटगार, श्री.भरत उपाध्ये, मुख्याध्यापिका श्रीमती.अनिता हाडोळे, सौ प्रतिभा शिरसाड या उपस्थित होत्या. सौ.सुशीला उपाध्ये यांच्या शुभहस्ते नटराज मूर्तीचे पूजन,श्री. प्रकाश नागोरे साहेब यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.
उपशिक्षणाधिकारी विठ्ठल ढेपे साहेब यांच्या शुभहस्ते रंगमंचाचे पूजन करून फित कापून या कार्यक्रमाचे उद्घघाटन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.रमेश यादवाड सर यांनी केले. या उद्घघाटन कार्यक्रम प्रसंगी बोलताना श्री.विठ्ठल ढेपे साहेबांनी संस्था, शाळा, मुख्याध्यापक व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या वार्षिक स्नेहसंमेलन मध्ये महाराष्ट्राची वारकरी दिंडी, ऑपरेशन सिंदूर,आई जगण्याच महत्त्व, लाटी-काटी, कांतारा, स्त्री पुरुष समानता, दशावतार, गोंधळ गीत, कोळी गीत, राजस्थानी गीत, घनगर गीत,मंगळागौर,मुजरा, लघुनाटिका, लता मंगेशकर गान कोकिळा अशा सर्व प्रकारच्या कलागीतांचे उत्कृष्ट सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले.
शेवटी 5 वी ते 7 वी या गटातून धनगर गीत तर 8 वी ते 10 वी गटातून देशभक्तीपर गीताना उत्कृष्ट सादरीकरण केल्याबद्दल मान्यवरांच्या शुभ हस्ते ट्रॉपी व पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या सादरीकरणाचे परीक्षक म्हणून श्रीम. दर्शना उपाध्ये आणि सौ.रेवती डहाळे काम पहिले. इयत्ता 5 वी अ वर्गाला यावर्षीचा जनरल चॅम्पियनशिप पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमास पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालाचे मुख्याध्यापक श्री रमेश यादवाड,सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.बगले एस.एम,श्रीम.कस्तुरे , श्रीम. शिंदे एस. एस. तर आभार सौ. माने ए. एस. यांनी मानले.

























