वाशी – राज्यात सध्या थंडीची तीव्र लाट उसळल्याने हुडहुडी वाढली आहे. वातावरणात मोठ्या प्रमाणात गारठा जाणवत असून नागरिक थंडीपासून बचावासाठी उबदार कपड्यांचा वापर करू लागले आहेत. वाशी तालुक्यातील तेरखेडा परिसरातही थंडीची तीव्रता वाढल्याने गल्लोगल्ली शेकोट्या पेटताना दिसत आहेत.
गावातील उकरंडे गल्ली परिसरात शेकोट्यांभोवती लहान-थोर एकत्र जमून थंडीपासून बचाव करताना दिसत असून, शेकोटीचा मनमुराद आनंद घेत सामाजिक एकोप्याचे दृश्य पाहायला मिळत आहे.

























