सोलापूर : मागील काही दिवसांपासून सोलापूर शहरांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या खासदारकीवरून जो कलगीतुरा रंगला होता तो जरी आमदार रोहित पवार यांच्या सोशल मीडियावरील वक्तव्याने वादावर पडदा पडला आहे.
मात्र याचा मोठा फटका राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व आमदार रोहित पवार यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर यांची मात्र पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. सोलापूर शहराचे अध्यक्ष भारत जाधव यांनी बाबर यांची पक्षातून हकालपट्टी करत असलेला आदेश काढला आहे, त्या पक्षाच्या आदेशात जाधव यांनी काय लिहिले आहे वाचा ते पत्र सविस्तरपणे…
प्रति,
श्री. प्रशांत बाबर
पत्ता :- शिवगंगा नगर, जुळे सोलापूर,
आपणास कळविण्यात येते की, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेश युवक उपाध्यक्ष या महत्वाच्या पदावर असताना पदाची जाण न ठेवता आपण सार्वजनिक ठिकाणी प्रदेश अध्यक्षांच्या बैठकी वेळी माध्यमांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या प्रदेश अध्यक्ष विषयी चुकीची माहिती देणे. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी शहर निरीक्षक यांच्या विषयी राष्ट्रवादी सोशल मिडियाच्या आधिकृत पेज चुकीचे अपशब्द बदनामी कारक विधान वापरून ग्रूपवर पोस्ट करणे व पक्ष कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करणे. त्याच प्रमाणे शहराध्यक्ष यांना फोन वरून वादावादी करणे अशा गंभीर चुका आपणाकडून झाले आहेत. याबाबत आपल्याला वारंवार सूचना देण्यात आले असता आपण सदर सुचनांकडे दुर्लक्ष करून कार्यकर्त्याच्या मध्ये व महाविकास आघाडीमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण करत आहात. त्याकरिता आपले श्रेष्ठीच्या आदेशावरून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातून हाकलपट्टी करण्यात येत आहे. सोबत पुरावे जोडत आहोत.