सोलापूर – सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या गड्डा यात्रेचे कार्यालय पंचकट्टा येथे मोठ्या उत्साही आणि भक्तीमय वातावरणात श्रीसिद्धरामेश्वरांच्या पूजेने सुरू करण्यात आले. यावेळी श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, सोमशंकर देशमुख आणि सिद्धेश्वर बमणी यांच्या हस्ते पुरोहितांच्या मंत्रोच्चारात श्रींचे पूजन करण्यात आले.
दरम्यान, या पूजेनंतर यात्रा निर्विघ्न पार पाडू दे हीच प्रार्थना सिद्धरामेश्वर महाराजांच्या चरणी असल्याचे श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे चेअरमन धर्मराज काडादी यांनी सांगितले. यावेळी श्री सिद्धेश्वर यात्रेच्या कार्यालयाचे कामकाज प्रत्यक्षात सुरू होणार आहे. यात्रा कालावधीत दिली जाणारे स्टॉलची परवानगी देण्यात येणार आहे.
यावेळी श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज कडादी, सोमशंकर देशमुख, यात्रा कमिटीचे चेअरमन महादेव चाकोते, डॉ.राजेंद्र घुली, काशीनाथ डोले, सुरेश म्हेत्रे, विश्वनाथ लब्बा, सिद्धेश्वर बामणी, मल्लिनाथ मसरे, रतन रिक्के,पशुपतीनाथ माशाळ आदींची उपस्थिती होती.
चौकट
श्रीसिध्देश्वर देवस्थान यात्रा कमिटीच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर
ग्रामदैवत शिवयोगी श्री सिध्दरामेश्वर यांच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर श्री सिध्देश्वर देवस्थान यात्रा कमिटीच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये श्री सिध्देश्वर यात्रा जनरल समितीच्या चेअरमनपदी महादेव चाकोते यांची निवड करण्यात आली आहे. या समितीमध्ये प्रकाश बिराजदार, अॅड. मिलिंद थोबडे, अॅड. विश्वनाथ आळंगे, प्रा. राजशेखर येळीकर, रतन रिक्के, शिवकुमार पाटील, नीलकंठप्पा कोनापुरे, गुरुराज माळगे यांचा समावेश आहे.
जागा देणाऱ्या समितीच्या चेअरमनपदी प्रकाश बिराजदार यांची निवड झाली आहे. या समितीत भीमाशंकर पटणे, बाळासाहेब भोगडे, मल्लिकार्जुन कळके, गुरुराज माळगे आणि रतन रिक्के यांचा समावेश आहे. मिरवणूक समितीच्या चेअरमनपदी अॅड. मिलिंद थोबडे यांची तर महादेव चाकोते, बाळासाहेब भोगडे, मल्लिकार्जुन कळके, सोमशंकर देशमुख, विश्वनाथ लब्बा, सुरेश म्हेत्रे (कुंभार), मल्लिनाथ मसरे यांची सदस्य म्हणून निवड झाली आहे.
शोभेच्या दारूकाम समिती चेअरमनपदी अॅड. विश्वनाथ आळंगे यांची निवड झाली आहे. अॅड. मिलिंद थोबडे, मल्लिकार्जुन कळके, अॅड. रेवणसिध्द पाटील, डॉ. राजेंद्र घुली, विलास कारभारी हे सदस्य आहेत.
प्रचार व प्रसिद्धी समितीच्या चेअरमनपदी प्रा. राजशेखर येळीकर यांची निवड झाली आहे. अॅड. रेवणसिध्द पाटील, प्रा. गंगाधर कुमठेकर, डॉ. राजेंद्र घुली, काशीनाथ डोले, चन्नवसव नाडगौडा हे सदस्य आहेत.
प्रसाद वाटप समितीच्या चेअरमनपदी रतन रिक्के यांची निवड झाली आहे. मल्लिकार्जुन कळके, गिरीश गोरनळ्ळी, सुरेश म्हेत्रे (कुंभार), प्रभूराज मेंदीकर हे सदस्य आहेत. रंग व वीज रोषणाई समितीच्या चेअरमनपदी शिवकुमार पाटील यांची निवड झाली आहे. सुभाष मुनाळे, विश्वनाथ लब्बा, गिरीश गोरनळ्ळी, नितीन उपासे हे सदस्य आहेत.
जनावर बाजार समितीच्या चेअरमनपदी नीलकंठ कोनापुरे यांची निवड झाली आहे. तर काशीनाथ दर्गीपाटील, शिवकुमार पाटील, मल्लिनाथ मसरे, प्रकाश बिराजदार हे सदस्य आहेत.
कृषी प्रदर्शन समितीच्या चेअरमनपदी गुरुराज माळगे यांची निवड झाली आहे. अॅड. मिलिंद थोबडे, मल्लिनाथ मसरे, काशीनाथ ढोले, विलास कारभारी, पशुपतीनाथ माशाळ हे सदस्य आहेत.


























