मोडनिंब – (ता. माढा) येथील श्री उमा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या संकुलात करमाळा उपविभागीय पोलीस कार्यालयामार्फत निर्भया पथकाचे मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रेरणा तोडकरी होत्या. कार्यक्रमात पोलीस हवालदार मंगेश पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत वाहन वापरासंबंधी कायदे, महिला अत्याचार प्रतिबंधक कायदे, लैंगिक अत्याचार विरोधी कायदा तसेच सोशल मीडियाच्या वापराचे दुष्परिणाम व वापरताना घ्यावयाची काळजी याबाबत विविध उदाहरणांच्या माध्यमातून सविस्तर माहिती दिली.
यावेळी विद्यालयातील माजी विद्यार्थी विक्रांत मारुती पवार यांची भारतीय वायुसेनेत निवड झाल्याबद्दल विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.कार्यक्रमास पोलीस हवालदार संभाजी पवार, गणेश गुटाळ, विद्या इंगोले, माता–पालक संघ व सखी सावित्री समितीचे सदस्य, पालकवर्ग तसेच आशा वर्कर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य एस. आर. पाटील यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किमान कौशल्य विभाग प्रमुख संतोष लोकरे तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. संस्थेचे अध्यक्ष मनोहर डोंगरे व सचिव व्ही. के. पाटील यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. झरेकर यांनी केले.


























