वेळापूर – करमाळा विट येथे झालेल्या १४ वर्षे खो खो राज्यस्तरीय निवड चाचणीमध्ये लोकविकास विद्यालयातील यश राजू कदम व यश राहूल बनसोडे या दोन खेळाडूंची निवड झाली आहे.त्यांना क्रिडा शिक्षक अजित बनकर ,सागर एकतपूरे,नितिन बनकर यांचे मार्गदर्शन लाभले.
खेळाडूच्या यशबद्दल संस्थेचे संस्थापक जालिंदर बनकर ,सचिव चंद्रकांत नवले, शिवगंगा दूध डेअरी चेअरमन भागवत गायकवाड ,सचिन बनकर मुख्याध्यापक सुनील पातळे, अमोल पांढरे यांनी अभिनंदन केले.


























