सोलापूर – रविवार, २१ डिसेंबर रोजी जागतिक ध्यान दिन निमित्त सोलापूर पिरॅमिड स्पिरिच्युअल ट्रस्ट यांच्या वतीने श्री गणेश पिरॅमिड ध्यान मंदिर, सोलापूर येथे सकाळी ११ वाजता तसेच हेरिटेज बॅक्वेट हॉल येथे पहाटे ६.३० वाजता विशेष ध्यान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
जागतिक ध्यान दिन हा दरवर्षी २१ डिसेंबर रोजी साजरा केला जातो, ज्याला संयुक्त राष्ट्रांनी मान्यता दिली आहे आणि या दिवसाचा उद्देश ध्यानधारणेच्या फायद्यांबद्दल जागरूकता निर्माण करणे, तणाव कमी करणे आणि मानसिक शांतता व जागतिक ऐक्य वाढवणे हा आहे, ज्यामध्ये भारत एक प्रमुख जागतिक भागीदार आहे आणि २१ डिसेंबरची निवड हिवाळी संक्रांतीमुळे झाली आहे, जी अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचे प्रतीक आहे. ध्यानामुळे मन स्थिर होते व अंत:करणात शांतता प्रस्थापित होते.
नियमित ध्यानामुळे तणाव कमी होतो, आरोग्य व सकारात्मकता वाढते. त्यामुळे सोलापूर पिरॅमिड स्पिरिच्युअल ट्रस्ट अंतर्गत हैद्राबाद रोड, जुना विडी घरकुल, यशोधरा हॉस्पिटल जवळील श्री गणेश पिरॅमिड ध्यान मंदिरात सकाळी ११ वाजता तसेच हेरिटेज बॅक्वेट हॉल येथे पहाटे ६.३० वाजता ध्यान शिबिर आयोजित केले. या ध्यान शिबिराचा सगळ्यांनी लाभ घ्यावी, असे आवाहन सोलापूर पिरॅमिड स्पिरिच्युअल ट्रस्टचे पदाधिकारी व सदस्यांनी केले आहे.


























